दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्याचे उपाय -- डॉ. पांडुरंग श्रीरामे ,दंतरोग तज्ञ मुख आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य दाताच्या ठेवणीवर अवलंबून असते..दातांमुळे आपल्या चेहरा अधिकच सुंदर व हसरा दिसतो. त्यामुळे दातांचे आरोग्य टिकविणे फार जरुरी आहे दातांचे आरोग्य ठीक नसल्यास अनेक आजार होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे दैनिक दिनचर्येत दातांचे आरोग्य टिकविणे जरुरी आहे. दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय – 1. चांगल्या प्रकारे दात घासावेत – आपल्या दातांना दररोज सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी नियमित ब्रश करणे फार जरुरी आहे. दातांमध्ये दिवसभराची घाण जमलेली असते त्यामुळे रात्री झोपण्याआधी ती घाण साफ करणे आवश्यक असते सकाळी ब्रश केल्याने दिवसभर तोंडात दुर्गंधी राहत नाही .ब्रश केल्याने ताजेतवाने वाटते. ब्रश ची निवडही योग्य असावी.ब्रश अती कडक नसावा, सॉफ्ट किंवा अतिसॉफ्ट असावा . तसेच फ्लूओराईडयुक्त टूथपेस्टची निवड करावी. तोंडात प्रत्येक भागात दातांची साफसफाई करण्यास किमान पाच मिनिटे द्यावीत दातां बरोबर आपल्या जिभेची ही साफसफाई करणे फार जरुरी आहे, त्यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होते. काही लोक दिव
मुख आरोग्य आणि मुखकर्करोग(Oral Cancer)य़ांचा परस्पर घनिष्ट संबध- डॉ.पांडुरंग श्रीरामे (दंतरोग तज्ञ) दात नियमित स्वच्छ न केल्यास फक्त दात किडणे किंवा तोंडातून दुर्गंधी येणे याच समस्या निर्माण होत नाहीत तर Oral Cancer सारख्या भयानक आजाराला देखील सामोरे जावे लागू शकते. नियमित दातांची निगा न राखल्यामुळे दातदुखी,तोंड येणे,दात किडणे किंवा तोंडातून दुर्गंधी येणे यांच्या समस्या निर्माण होतात.मात्र एवढंच नाही तर हे तोंडाच्या कर्करोगाचेही लक्षण असु शकते. ‘तोंडाचा कर्करोग हा जबडयाच्या आतल्या बाजुला असलेली त्वचा स्नायु,नसा,हिरड्यांमध्ये होण्याची शक्यता असते.ओरल कॅन्सरवर उपचार असले तरी दुर्देवाने निष्काळजीपणा व अयोग्य मार्गदर्शनामुळे आत्तापर्यंत अनेकांचा यात मृत्यु झाला आहे.’ सामान्यत: तोंडामधील कर्करोग हा ५० वर्षांवरील लोकांमध्ये जास्त आढळतो पण काहीवेळा तरुणांमध्येही या रोगाची लक्षणे दिसुन आलेली आहेत. ‘धुम्रपान,मद्यपान,तंबाखु व सुपारीचे अतिसेवन,ओठांचा सतत सुर्यप्रकाशाशी सबंध आल्याने हा आजार अधिक बळावतो.तसेच तोंडातील अस्वच्छतेमुळेही तोंडातील कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते.’ त्यासोबतच ज