Skip to main content
दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्याचे उपाय -- डॉ. पांडुरंग श्रीरामे ,दंतरोग तज्ञ मुख

आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य दाताच्या ठेवणीवर अवलंबून असते..दातांमुळे आपल्या चेहरा अधिकच सुंदर व हसरा दिसतो. त्यामुळे दातांचे आरोग्य टिकविणे फार जरुरी आहे दातांचे आरोग्य ठीक नसल्यास अनेक आजार होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे दैनिक दिनचर्येत दातांचे आरोग्य टिकविणे जरुरी आहे.

दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय –
1. चांगल्या प्रकारे दात घासावेत –
आपल्या दातांना दररोज सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी नियमित ब्रश करणे फार जरुरी आहे. दातांमध्ये दिवसभराची घाण जमलेली असते त्यामुळे रात्री झोपण्याआधी ती घाण साफ करणे आवश्यक असते सकाळी ब्रश केल्याने दिवसभर तोंडात दुर्गंधी राहत नाही .ब्रश केल्याने  ताजेतवाने वाटते.
ब्रश ची निवडही योग्य असावी.ब्रश अती कडक नसावा, सॉफ्ट किंवा अतिसॉफ्ट असावा . तसेच फ्लूओराईडयुक्त टूथपेस्टची निवड करावी.
तोंडात प्रत्येक भागात दातांची साफसफाई करण्यास किमान पाच मिनिटे द्यावीत दातां बरोबर आपल्या जिभेची ही साफसफाई करणे फार जरुरी आहे, त्यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होते. काही लोक दिवसातून जेवढ्या वेळा अन्न ग्रहण करतात त्यानंतर ब्रश करतात ही एक चांगली सवय आहे परंतू आपण किमान दिवसातून दोन वेळा तरी ब्रश करावा.

2. दातांची अंतर्गत सफाई –

दातांची अंतर्गत सफाई करणे फार जरुरी आहे यासाठी रेशमी धागा(डेंटलं फ्लॉस) घेऊन तोंडात समोरील दातांच्या फटीमधील घाण बाहेर काढण्यास मदत होते.

ज्या ठिकाणी ब्रश पोहोचू शकत नाही व या ठिकाणाची सफाई माऊथवॉश ही करू शकत नाही त्यासाठी ही प्रक्रिया करणे जरुरी आहे परंतु यात फार वेळ जातो आठवड्यातून किमान दोन वेळा ही प्रक्रिया नक्की करावी.

3. माऊथवॉश चा वापर –

माऊथवॉश चा वापर करणे खर्चिक पण चांगली सवय आहे. माऊथवॉश मुळे तोंडातील अपायकारक जीवाणू दूर केले जातात अडकलेल्या पदार्थांचा दुर्गंधी नष्ट होतो व दातांना पोषण मिळते. आपला माऊथवॉश मध्ये लीस्त्रीन व क्लोरिनची मात्र चांगली असायला हवी. ब्रश केल्यानंतर माऊथवॉश दातांना निरोगी बनवण्यास नक्कीच मदत होते. माऊथवॉश ने आपणास ताजेतवाने वाटते आपल्या मुखातून चांगला गंध येतो.

4. कॅल्शियम व जीवनसत्वे युक्त पेस्टचा वापर –

बाजारात कॅल्शिअम व जीवनसत्त्वे युक्त पेस्ट असल्याचा दावा बरेच ब्रेंड करतात परंतु तुम्ही या सर्वांमध्ये योग्य ब्रेंड ची निवड करावी वापरल्यामुळे फायदा होत असल्यावरच त्याचा वापर सुरू ठेवावा.

5. कॅल्शियम व जीवनसत्वे युक्त आहार –

आपल्या आहारात कॅल्शियम युक्त पदार्थाचे सेवन जास्त करावे गोड पदार्थाचा वापर कमी करावा खाल्ल्यानंतर पाण्याने गुळणी करून दातांची काळजी घ्यावी. दही, दुध, संत्रा ज्यूस, सुकामेवा, हिरव्या भाज्या यांचा वापर जास्त करावा. दात सडण्यापासून वाचवण्यासाठी जीवनसत्त्वयुक्त पदार्थाचा वापर करावा लहान मुलांमध्ये दातांची वाढ नीट ठेवण्यासाठी त्यांना जीवनसत्वे युक्त आहार नक्कीच द्यावा. कॉपर,झिंक,आयोडीन आणि पोटॅशियम युक्त आहार घ्यावा.

6. आपल्या जिभेचे toung cleaner  च्या साहाय्याने साफ करावे –

आपल्या जिभेस साफ करावे कारण खाल्लेला पदार्थांचे सूक्ष्म कण जिभेवर राहतात त्यामुळे मुखाची दुर्गंधी सारखे विकार होऊ शकतात दररोज जिभेची योग्य प्रकारे साफसफाई होणे जरुरी आहे.

7. तंबाखू व बिडी चे सेवन करू नये –

तंबाखूमध्ये निकोटिन असते त्यामुळे आपले मुख दुर्गंधीने व अपायकारक घटकांचे निशाण्यावर येते तंबाखू मुखाच्या कर्करोगासाठी जो मुख्यतः दातांच्या सडन्यामुळे जास्त वाढतो त्याची सुरुवात दात सडणे व त्यातून रक्तही येण्यापासून सुरू होते. तंबाखू सेवनामुळे मुखाचा आंतरिक भागाशी संबंधित रोगांची होण्याची शक्यता वाढते.

8. सोडा, कॉफी आणि मद्य यांचे सेवन शक्यतो फार कमी करावे –
                                        सोडा, कॉफी आणि मद्य यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण फार असते त्यामुळे हे आपल्या दातांच्या आरोग्याला अपायकारक मानले जाते त्यामुळे यांचे सेवन कमी करावे

9. दातांच्या दुखण्यास दुर्लक्ष करू नये –

दातांमध्ये दुखणे असल्यास त्याचीही तपासणी व उपचार घेणे आपली प्राथमिकता असायला हवी. कोणताही त्रास दुर्लक्ष करू नये त्यामुळे समस्या वाढून मोठ्या समस्याची निर्मिती होते त्यामुळे दातांचे आरोग्य टिकवण्यासाठी दातांच्या तज्ज्ञांना दाखवावे.

10. दातांची नियमित तपासणी –

आपल्या दातांचे नियमित तपासणी करून घ्यावी त्यामुळे होणारा समस्यांचे निराकरण करता येते .डॉक्टरांचा सल्ला नेहमीच पाळा व त्यानुसार आपली दिनचर्या असावी.

दात आपल्या आरोग्याचे आणि सौंदर्याचे एक अभिन्न अंग आहे त्यामुळे त्यांचे सौंदर्य टिकवणे फार जरुरी आहे...

Comments

Popular posts from this blog

तंबाकू आणि मुखकर्करोग

       तंबाकूमुळे  कॅन्सर होतो                 आज 31मे, सर्व जगामध्ये आजचा दिवस जागतिक तंबाखूवर्ज्य दिवस(No Tobbacco Day) म्हणून साजरा केला जातो.                            गुटखा आणि तंबाखू खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग होतो, हे आपण लहानपणापासून ऐकत आहोत. यासंदर्भात गावात, शहरात, राज्यात, देशात आणि जगभरात जनजागृती केली जाते. सिगारेटच्या पाकिटावरदेखील कर्करोगाची भयानकता दर्शविणारे चित्रही प्रसिद्ध करण्याचे बंधन आरोग्य विभागाने घातले असून त्याचेही काटेकोर पालन होते. मात्र, तंबाखू खाणार्‍यांचे आणि सिगारेट ओढणार्‍यांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही. या व्यसनामुळे नागरिक स्वत:हून कर्करोगासारख्या आजाराला निमंत्रण देताना दिसून येतात. क्षणभराच्या नशेसाठी आणि तलफ भागवण्यासाठी तंबाखू, सिगारेटच्या आहारी जाणार्‍या मंडळींमुळे कुटुंबाचे किती नुकसान होते, ही बाब आकलनापलीकडची आहे.      आजघडीला देशात दरवर्षी तोंडाच्या कर्करोगाची 75 ते 80 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. तोंडाच्या कर्करोगासंबंधी माहितीचा आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे नागरिक अचूक आणि योग्य उपचारापासून वंचित राहतात. विशेषत:

मुख आरोग्य आणि मुखकर्करोग(Oral Cancer)य़ांचा परस्पर घनिष्ट संबध- डॉ.पांडुरंग श्रीरामे (दंतरोग तज्ञ

मुख आरोग्य आणि मुखकर्करोग(Oral Cancer)य़ांचा  परस्पर घनिष्ट  संबध- डॉ.पांडुरंग श्रीरामे (दंतरोग तज्ञ) दात नियमित स्वच्छ न केल्यास फक्त दात किडणे किंवा तोंडातून दुर्गंधी येणे याच समस्या निर्माण होत नाहीत तर Oral Cancer सारख्या भयानक आजाराला देखील सामोरे जावे लागू शकते. नियमित दातांची निगा न राखल्यामुळे दातदुखी,तोंड येणे,दात किडणे किंवा तोंडातून दुर्गंधी येणे यांच्या समस्या निर्माण होतात.मात्र एवढंच नाही तर हे तोंडाच्या कर्करोगाचेही लक्षण असु शकते.  ‘तोंडाचा कर्करोग हा जबडयाच्या आतल्या बाजुला असलेली त्वचा स्नायु,नसा,हिरड्यांमध्ये होण्याची शक्यता असते.ओरल कॅन्सरवर उपचार असले तरी दुर्देवाने निष्काळजीपणा व अयोग्य मार्गदर्शनामुळे आत्तापर्यंत अनेकांचा यात मृत्यु झाला आहे.’ सामान्यत: तोंडामधील कर्करोग हा ५० वर्षांवरील लोकांमध्ये जास्त आढळतो पण काहीवेळा तरुणांमध्येही या रोगाची लक्षणे दिसुन आलेली आहेत. ‘धुम्रपान,मद्यपान,तंबाखु व सुपारीचे अतिसेवन,ओठांचा सतत सुर्यप्रकाशाशी सबंध आल्याने हा आजार अधिक बळावतो.तसेच तोंडातील अस्वच्छतेमुळेही तोंडातील कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते.’ त्यासोबतच ज