Skip to main content

Posts

Showing posts from December, 2019
दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्याचे उपाय -- डॉ. पांडुरंग श्रीरामे ,दंतरोग तज्ञ मुख आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य दाताच्या ठेवणीवर अवलंबून असते..दातांमुळे आपल्या चेहरा अधिकच सुंदर व हसरा दिसतो. त्यामुळे दातांचे आरोग्य टिकविणे फार जरुरी आहे दातांचे आरोग्य ठीक नसल्यास अनेक आजार होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे दैनिक दिनचर्येत दातांचे आरोग्य टिकविणे जरुरी आहे. दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय – 1. चांगल्या प्रकारे दात घासावेत – आपल्या दातांना दररोज सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी नियमित ब्रश करणे फार जरुरी आहे. दातांमध्ये दिवसभराची घाण जमलेली असते त्यामुळे रात्री झोपण्याआधी ती घाण साफ करणे आवश्यक असते सकाळी ब्रश केल्याने दिवसभर तोंडात दुर्गंधी राहत नाही .ब्रश केल्याने  ताजेतवाने वाटते. ब्रश ची निवडही योग्य असावी.ब्रश अती कडक नसावा, सॉफ्ट किंवा अतिसॉफ्ट असावा . तसेच फ्लूओराईडयुक्त टूथपेस्टची निवड करावी. तोंडात प्रत्येक भागात दातांची साफसफाई करण्यास किमान पाच मिनिटे द्यावीत दातां बरोबर आपल्या जिभेची ही साफसफाई करणे फार जरुरी आहे, त्यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होते. काही लोक दिव

मुख आरोग्य आणि मुखकर्करोग(Oral Cancer)य़ांचा परस्पर घनिष्ट संबध- डॉ.पांडुरंग श्रीरामे (दंतरोग तज्ञ

मुख आरोग्य आणि मुखकर्करोग(Oral Cancer)य़ांचा  परस्पर घनिष्ट  संबध- डॉ.पांडुरंग श्रीरामे (दंतरोग तज्ञ) दात नियमित स्वच्छ न केल्यास फक्त दात किडणे किंवा तोंडातून दुर्गंधी येणे याच समस्या निर्माण होत नाहीत तर Oral Cancer सारख्या भयानक आजाराला देखील सामोरे जावे लागू शकते. नियमित दातांची निगा न राखल्यामुळे दातदुखी,तोंड येणे,दात किडणे किंवा तोंडातून दुर्गंधी येणे यांच्या समस्या निर्माण होतात.मात्र एवढंच नाही तर हे तोंडाच्या कर्करोगाचेही लक्षण असु शकते.  ‘तोंडाचा कर्करोग हा जबडयाच्या आतल्या बाजुला असलेली त्वचा स्नायु,नसा,हिरड्यांमध्ये होण्याची शक्यता असते.ओरल कॅन्सरवर उपचार असले तरी दुर्देवाने निष्काळजीपणा व अयोग्य मार्गदर्शनामुळे आत्तापर्यंत अनेकांचा यात मृत्यु झाला आहे.’ सामान्यत: तोंडामधील कर्करोग हा ५० वर्षांवरील लोकांमध्ये जास्त आढळतो पण काहीवेळा तरुणांमध्येही या रोगाची लक्षणे दिसुन आलेली आहेत. ‘धुम्रपान,मद्यपान,तंबाखु व सुपारीचे अतिसेवन,ओठांचा सतत सुर्यप्रकाशाशी सबंध आल्याने हा आजार अधिक बळावतो.तसेच तोंडातील अस्वच्छतेमुळेही तोंडातील कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते.’ त्यासोबतच ज

तंबाकू आणि मुखकर्करोग

       तंबाकूमुळे  कॅन्सर होतो                 आज 31मे, सर्व जगामध्ये आजचा दिवस जागतिक तंबाखूवर्ज्य दिवस(No Tobbacco Day) म्हणून साजरा केला जातो.                            गुटखा आणि तंबाखू खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग होतो, हे आपण लहानपणापासून ऐकत आहोत. यासंदर्भात गावात, शहरात, राज्यात, देशात आणि जगभरात जनजागृती केली जाते. सिगारेटच्या पाकिटावरदेखील कर्करोगाची भयानकता दर्शविणारे चित्रही प्रसिद्ध करण्याचे बंधन आरोग्य विभागाने घातले असून त्याचेही काटेकोर पालन होते. मात्र, तंबाखू खाणार्‍यांचे आणि सिगारेट ओढणार्‍यांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही. या व्यसनामुळे नागरिक स्वत:हून कर्करोगासारख्या आजाराला निमंत्रण देताना दिसून येतात. क्षणभराच्या नशेसाठी आणि तलफ भागवण्यासाठी तंबाखू, सिगारेटच्या आहारी जाणार्‍या मंडळींमुळे कुटुंबाचे किती नुकसान होते, ही बाब आकलनापलीकडची आहे.      आजघडीला देशात दरवर्षी तोंडाच्या कर्करोगाची 75 ते 80 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. तोंडाच्या कर्करोगासंबंधी माहितीचा आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे नागरिक अचूक आणि योग्य उपचारापासून वंचित राहतात. विशेषत: